Buldha, एप्रिल 18 -- बुलढाणा जिल्ह्यात केस गळती होऊन लोकांच्या डोक्यावर टक्कल पडले होते. तेथे आता नवीन आजाराने डोके वर काढले आहे. केस गळतीनंतर चक्क लोकांच्या बोटांची नखे गळायला लागली आहे. बोंडगावसह चार गावात तब्बल २९ जणांचे नख गळतीचे प्रकरण समोर आले आहेत.

बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात एक गूढ आजार पाहायला मिळत आहे. अनेक गावांमध्ये अचानक लोकांची नखे निखलून पडू लागल्याने घबराट पसरली. काही महिन्यांपूर्वी तथाकथित 'टक्कल व्हायरस'मुळे अनेकांना गंभीर केस गळतीला सामोरे जावे लागले होते. स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०२४ मध्ये बोंडगाव आणि आसपासच्या गावातील सुमारे ३०० गावकऱ्यांनी वेगाने केस गळत असल्याची तक्रार केली होती. आता एका विदारक घटनेत अनेकांना नखांची विकृती आणि ती पडण्याच्या समस्येनेही ग्रासले आहे.

जिल्ह्यातील बाधित ...