Bijapur, फेब्रुवारी 14 -- छत्तीसगड पोलिसांनी ३१ पैकी २८ माओवाद्यांची ओळख पटवल्याचा दावा केला असून त्यात १७ पुरुष आणि ११ महिलांचा समावेश आहे. या सर्वांवर एकूण १ कोटी १० लाख रुपयांचे बक्षीस होते. ठार झालेल्या माओवाद्यांमध्ये ६ जानेवारी रोजी झालेल्या आयईडी स्फोटाच्या मास्टर माइंडचाही समावेश आहे. या स्फोटात सुरक्षा दलाचे आठ जवान आणि एका नागरिकाचा मृत्यू झाला होता. याशिवाय इतरही अनेक प्राणघातक हल्ले यांच्याकडून करण्यात आले होते.

बस्तर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी सांगितले की, बंदी घालण्यात आलेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (माओवादी) पश्चिम बस्तर विभागाचा सचिव हुंगा कर्मा याच्यावर आठ लाख रुपयांचे बक्षीस होते. ६ जानेवारी रोजी सुरक्षा रक्षकांवर झालेल्या हल्ल्याचा तो मास्टरमाईंड होता. २००६ मध्ये मुरकिनार कॅम्पवर झालेल्या ह...