Patna, एप्रिल 8 -- सिंघम या नावाने ओळखले जाणारे मराठमोळे माजी आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी बिहारमध्ये हिंद सेना नावाचा नवा पक्ष स्थापन केला आहे, जो या वर्षाच्या अखेरीस बिहार विधानसभा निवडणूक लढवणार आहे. शिवदीप वामनराव लांडे बिहारमधील २४३ जागांवर निवडणूक लढवणार आहेत, मग तो उमेदवार आणि चेहरा कोणताही असो. त्यांच्या विचारधारेला अनुसरणाऱ्यांनाच पक्षाची उमेदवारी दिली जाईल, असे ते म्हणाले. शिवदीप लांडे हे मूळचे महाराष्ट्र राज्यातील असले तरी ते बिहार कॅडरचे आयपीएस अधिकारी होते आणि व्हीआरएस घेतल्यानंतर त्यांनी बिहार सोडणार नसल्याचे जाहीर केले होते. गेल्या वर्षी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनीही जन सुराज पार्टी नावाचा नवा पक्ष स्थापन केला होता.

शिवदीप लांडे पाटण्यातील पत्रकार परिषदेत बिहार आणि राजकारणावर आपले मत मांडताना म्हणाले की, आयप...