Mumbai, मे 8 -- बॉलिवूडचे पॉवर कपल अर्थात अभिनेता रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण अचानक त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. आता या दोघांच्या वैवाहिक जीवनावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जेव्हापासून हे दोघे करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या शोमध्ये सहभागी झाले होते, तेव्हापासून त्यांच्यातील मतभेदाच्या बातम्या समोर येत आहेत. मात्र, आता ही जोडी वेगळी होणार असल्याच्या चर्चांनी चांगलाच जोर धरला आहे. असं नेमकं काय घडलं, ज्यामुळे दोघांच्या वेगळं होण्याच्या चर्चा सुरू झाल्या? चला जाणून घेऊया...

असे म्हटले जात आहे की रणवीर आणि दीपिका यांच्यातील मतभेद इतके वाढले आहेत की, अभिनेत्याने आता त्याच्या इंस्टाग्रामवरून लग्नाचे फोटो हटवले आहेत. रणवीर सिंहच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर त्याच्या आणि दीपिकाच्या लग्नाचे फोटो दिसत नाहीयत. मात्र, दीपिकाने अद्य...