भारत, जानेवारी 28 -- Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकी यांचे पुत्र आमदार झिशान सिद्दीकी यांनी जबाबाबत बाबा सिद्दीकी यांच्या डायरीचा उल्लेख केला आहे. त्यात भाजपचे मोहित कंबोज यांचे नाव असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. हत्या झाली त्या दिवशी त्यांचे मोहित कंबोज यांच्याशी चॅटींग झाल्याचे देखील त्यांनी सांगितले. त्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

झिशान सिद्दीकी यांनी गंभीर आरोप केले आहे. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी तपास करुन न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात पोलिसांना दिलेल्या माहितीचा उल्लेख नसून त्या दृष्टीने तपास केला गेला नाही असा आरोप बाबा सिद्दीकी यांचे पुत्र झिशान सिद्दीकी यांनी केल्याची माहिती आहे. झिशान सिद्दीकी यांनी हे वक्तव्य करताना बाबा सिद्दीकी यांच्याकडील एका डायरीचा उल्लेख केला आहे...