भारत, जानेवारी 28 -- Tragedy at Nirvana Festival in Baghpat : उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील बदावत शहरात मंगळवारी सकाळी एक मोठा अपघात झाला. भगवान आदिनाथांच्या निर्वाण लाडू उत्सवानिमित्त मानस्तंभाच्या आवारात लाकडी स्टेज कोसळले. कोसळलेल्या पायऱ्यांखाली सात भाविकांचा मृत्यू झाला. यात दोन महिलांसह पाच पुरुषांचा समावेश आहे. तर ८० हून अधिक भाविक जखमी झाले आहेत.

मृतांच्या नातेवाईकांनी शवविच्छेदनाला तीव्र विरोध केला आहे. त्यांनी डीएम, एसपींनी घेराव घातला. त्यावरून जोरदार वाद झाला. एसपी अर्पित विजयवर्गीय पोलीस दलासह घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य सुरू केले. या अपघातात महिलांसह पुरुष आणि लहान मुलेही जखमी झाली आहेत. त्याचवेळी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने जखमींना ई-रिक्षातून रुग्णालयात नेण्यात आले.

Waqf Bill : वक्फच्या सुधारीत विधेयकात १४ बदल...