Mumbai, जानेवारी 30 -- Gold Silver Price Today : येत्या शनिवारी देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर होत असून त्याआधी सोने व चांदीच्या भावानं उचल खाल्ली आहे. सोन्याच्या किमतींनी आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. दुपारी १२ वाजता प्रसिद्ध झालेल्या IBJA दरानुसार, २४ कॅरेट सोनं तोळ्याला ८१ हजार रुपयांच्या पुढं गेलं आहे. तर, चांदी ९१६०० रुपये किलो झाली आहे.

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननं (IBJA) सोन्याचे वेगवेगळ्या कॅरेटचे दर जाहीर केले आहेत. त्यात GST चा समावेश नाही. त्यामुळं प्रत्यक्ष किंमतीमध्ये १ ते २ हजार रुपयांचा फरक असू शकतो.

आयबीजेएच्या दरानुसार, २३ कॅरेट सोन्याचा सरासरी दर ८०६८२ रुपयांवर पोहोचला आहे. २२ कॅरेट सोन्याचा भावही ७४२०२ रुपयांवर पोहोचला असून १८ कॅरेट सोन्याचा भावही ६०,७५५ रुपयांवर पोहोचला आहे.

हेही वाचा: सहा महिन्यांत जवळ...