भारत, मार्च 21 -- बजाज फायनान्स लिमिटेडच्या शेअर्सच्या कामगिरीवर तज्ज्ञांमध्ये उत्साह आहे. ब्रोकरेज हाऊसेस या शेअरच्या कामगिरीबाबत खूप पॉझिटिव्ह दिसत आहेत, यामागचं कारण म्हणजे एमडी आणि सीईओ राजीव जैन यांच्याशी संबंधित माहिती. कंपनीच्या शेअर्समध्ये आज म्हणजेच शुक्रवारी तेजी पाहायला मिळाली आहे.

कंपनीचा शेअर आज बीएसईमध्ये तेजीसह ८९६०.०५ रुपयांच्या पातळीवर उघडला. दिवसभरात (सकाळी ९.४४) कंपनीच्या शेअरचा भाव ३.२६ टक्क्यांहून अधिक वाढून ९०७० रुपयांवर पोहोचला. कंपनीचा हा ५२ आठवड्यांतील उच्चांक आहे.

बजाज फायनान्सने राजीव जैन यांची तीन वर्षांसाठी उपाध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे. त्यांचा कार्यकाळ 1 एप्रिल 2025 पासून सुरू होणार आहे. त्यांच्या जागी उपव्यवस्थापकीय संचालक अनुपकुमार साहा यांची नवे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्य...