New delhi, फेब्रुवारी 27 -- उत्तर आफ्रिकेतील इस्लामिक देश मोरोक्कोच्या राजाने यावर्षी ईद-उल-अजहानिमित्त धार्मिक सणादरम्यान मेंढ्यांची कुर्बानी देऊ नये, असे आवाहन केले आहे. देश सलग सातव्या वर्षी दुष्काळाचा सामना करत असल्याचे राजा मोहम्मद सहावे यांनी आपल्या देशवासियांना सांगितले आहे. त्यामुळे देशातील पशुधनाची संख्या कमालीची घटली असून मांसाचे दर वाढले आहेत. दरवर्षी ईद-उल-अजहाच्या काळात जगभरातील मुस्लिम लाखो मेंढ्या, बकऱ्या आणि इतर जनावरांची कुर्बानी देतात.

यावर्षी ईद-उल-अजहा ६ किंवा ७ जून रोजी साजरी केली जाईल. इस्लाम धर्मातील दोन प्रमुख सणांपैकी हा एक सण आहे. इस्लामी मान्यतेनुसार हजरत इब्राहिम यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ ईद-उल-अजहा साजरी केली जाते. याला बकरी ईद, ईद उल जुहा, बकरी ईद किंवा ईद उल बकरा असेही म्हणतात. बकरी ईदनिमित्त नमाज पठण त...