भारत, फेब्रुवारी 17 -- Fastag Rules: सोमवारपासून म्हणजेच आजपासून फास्टॅगच्या नियमाबाबत मोठा बदल करण्यात आला आहे. जर एखाद्याचा फास्टॅग काळ्या यादीत टाकला गेला, किंवा बंद झाला किंवा कोणत्याही कारणास्तव निष्क्रिय झाला असेल तर संबंधित कारचालकाला टोल बूथ ओलांडण्यासाठी फास्टॅग हा ६० मिनिटे आधी रिचार्ज करावा लागणार आहे. टोल ओलांडल्यानंतर १० मिनिटांनीही देखील फास्टॅग रीचार्ज करण्याची सुविधा आहे. मात्र, जर वाहन वाहनचालकाने फास्टॅग अपडेट केला नाही तर त्याला दुप्पट दंड भरावा लागणार आहे.

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनने नुकतेच नवे नियम जारी केले आहेत, जे आज १७ फेब्रुवारीपासून लागू होणार आहेत. टोलकर वसुली सोपी व्हावी व टोलनाक्यांवरील वाहतूक सुरळीत व्हावी, हा यामागचा उद्देश आहे. नियमानुसार फास्टॅग खात्यात पैसे शिल्लक न राहणे, केवायसी पूर्ण न करणे किंवा परिवह...