Kolkata, एप्रिल 12 -- पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात वक्फ कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला अचानक हिंसक वळण लागलं, ज्यात दोन जणांना आपला जीव गमवावा लागला. मुर्शिदाबादमध्ये शुक्रवारी हिंसाचार उसळला होता आणि आतापर्यंत ११८ जणांना अटक करण्यात आली आहे. परिस्थिती पाहता पोलिसांना लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या गोळ्यांचा वापर करावा लागला, तर काही भागात सीमा सुरक्षा दलाचीही (बीएसएफ) मदत घेण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी शमशेरगंजच्या जाफराबाद भागात हिंसक जमावाने अचानक गावावर हल्ला केल्याने परिस्थिती बिघडली. या हल्ल्यात एकाच कुटुंबातील वडील आणि मुलगा या दोघांची निर्घृण हत्या करण्यात आली.

शुक्रवारी शुक्रवारच्या नमाजनंतर मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले आणि वक्फ कायद्याविरोधात निदर्शने करण्यास सुरुवात केली. शमशेरगं...