दिल्ली, जानेवारी 27 -- Bank of Baroda SO Recruitment 2025 : बेरोजगारांसाठी महत्वाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदाने स्पेशालिस्ट ऑफिसरच्या तब्बल १२६७ जागांवर भरती जाहीर केली आहे. या पदासाठी आज ऑनलाइन अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे बँकेच्या www.bankofbaroda.in या संकेतस्थळाला भेट देऊन त्यावर अर्ज करता येणार आहे.

बँक ऑफ बडोदाच्या विविध शाखांमध्ये कृषी विपणन अधिकारी, कृषी विपणन व्यवस्थापक, अधिकारी सुरक्षा विश्लेषक, विकासक आणि इतर पदांवर उमेदवारांची भरती केली जाणार आहे. या साठी बँकेने जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार त्यांची त्या पदावर नियुक्ती केली जाणार आहे.

या पदासाठी पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदवी, एमबीए/पीजीडीएम, सीए/सीएफए/सीएमए पदवी ग्राह्य धरली जाणार आहे. तसेच बीई आणि बीटेक पदवी धारक देखील या पदासाठी अर्ज करू शकणार आहेत. या प...