मार्सेल, फेब्रुवारी 12 -- PM Modi in Marseilles : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी फ्रान्सच्या मार्सेल शहरात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना आदरांजली वाहिली व भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील या शहराच्या महत्त्वपूर्ण इतिहासाची आठवण करून दिली. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात मार्सेलचे विशेष स्थान राहिले आहे. या शहरात वीर सावरकरांनी इंग्रजांच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी मार्सेलच्या नागरिकांनी व फ्रेंच आंदोलकांनी सावरकर यांना ब्रिटिशांच्या देऊ नये अशी भूमिका घेतली होती. यामुळे पंतप्रधान मोदी यांनी येथील जनतेचे आभार देखील मानले. तसेच त्यांचा वीर सावरकर यांचा लढा अनेक पिढ्यांना प्रेरणा देत असल्याचे देखील मोदी म्हणाले.

वीर सावरकरांचा मार्सेलशी संबंध १९१० पासून आहे. वीर सावरकर यांना लंडनमध्ये अटक केल्यावर त्यांना राजकीय कैद...