Mumbai, एप्रिल 22 -- Rajeshwari Kharat : नागराज मंजुळे यांच्या फॅन्ड्री या चित्रपटामुळे महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेली शालू म्हणजेच अभिनेत्री राजेश्वरी खरात आपल्या सोशल मीडिया पोस्टमुळे नेहमी चर्चेत असते. राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharat) हिने आयुष्यातील मोठा निर्णय घेतला असल्याची माहिती इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन दिलीये. म्हणजेच तिने ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला असल्याची माहिती दिली आहे.

राजेश्वरीने याबाबतची माहिती सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर सोशल मीडियावर तिला काही सकारात्मक तर काही नकारात्मक कमेंट्सना सामोरे जावे लागत आहे. राजेश्वरीने याबाबत सविस्तर कोणतेही भाष्य केलेले नाही. मात्र, तिने Baptised चे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

राजेश्वरीने ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर सगळीकडे खळबळ उडाली. य...