Navi Mumbai, फेब्रुवारी 2 -- Mumbai News : शिक्षण हा कायद्याने हक्क असतांना केवळ १००० रुपयांची फी भरली नाही म्हणून एका ५ वर्षांच्या मुलाला शाळेत डांबून ठेवण्यात आल्याचा प्रकार नवी मुंबई येथील एका शाळेत घडला आहे. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी शाळा प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मुलाच्या पालकाने शाळेची फी पूर्ण भरल्याची माहिती आहे.

नवी मुंबईतील सिवूड येथील ओर्चीड इंटरनॅशनल शाळेत ही घटना घडली. मुलाच्या पालकांनी शाळेची पूर्ण फी भरली असताना देखील शाळेच्या तांत्रिक चुकीमुळे ती भरली नसल्याचे कारण पुढे करत पाच वर्षांच्या चिमुकल्या विद्यार्थ्याला तब्बल ४ तास शाळेतील डे केअर सेंटर मध्ये डांबून ठेवल्याचे पुढे आले आहे. या प्रकरणी पालकांनी शाळा प्रशासनाला जाब विचारत थेट शाळे विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार ...