Delhi, नोव्हेंबर 13 -- Fast charging issue : इलेक्ट्रॉनिक उपकरणांशी संबंधित एक तंत्रज्ञान गेल्या काही वर्षांत झपाट्याने विकसित झाले आहे आणि ते म्हणजे फास्ट चार्जिंग. अनेकांना गडबड असल्याने ते या प्रकारच्या फास्ट चार्जरचा वापर करत असतात. फास्ट चार्जिंगमुळे स्मार्टफोनपासून टॅब्लेट आणि लॅपटॉपपर्यंत डिव्हाइसची बॅटरी पटकन चार्ज करता येते. या तंत्रज्ञानामुळे कमी वेळात वेगाने विद्युत प्रवाह पाठवून बॅटरी चार्ज करण्याचा वेग वाढवता येतो. यामुळे आपले इलेट्रॉनिक उपकरण चार्ज करण्यासाठी तासंतास थांबावे लागत नाही.

फास्ट चार्जिंगचा सर्वात मोठा फायदा म्हणजे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस कमी वेळात लवकर चार्ज होतो. यामुळे वेळेची बचत होते. याशिवाय जर इमर्जन्सीमध्ये फोन चार्ज करायचा असेल आणि जास्त वेळ नसेल तर अवघ्या काही मिनिटात या यंत्रणेमुळे आपला फोन पटकन चार्ज हो...