Mumbai, जानेवारी 30 -- Lover Burnt Girlfriend Alive: उत्तर प्रदेशातील प्रतापगडातून खळबळजनक घटना घडली आहे. कोहंडोर परिसरात एका व्यक्तीने प्रेयसीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत पेटवून दिले. त्यानंतर स्वत:ही आत्मदहनाचा प्रयत्न केला. या घटनेत प्रेयसीचा मृत्यू झाला आहे. तर, संबंधित तरुण गंभीररित्या भाजला गेला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, विकास कुमार यादव (वय, २९) असे प्रियकराचे नाव असून तो चंडोका येथील रहिवासी आहे. विकास याचे लोलीपोख्ता खाम येथील नालू यादव (वय, २२) हिच्यासोबत प्रेमसंबंध होते. परंतु, नीलू यादवचे दुसऱ्या तरुणाशी लग्न ठरले. हे लग्न येत्या २ मार्चला होणार होते. यानंतर विकासने नीलूला भेटण्यासाठी शेतात बोलवले. त्यानंतर त्याने स्वत:वर आणि नीलूवर पेट्रोल ओतले आणि त...