Malad, फेब्रुवारी 10 -- मुंबईतील मालाडयेथे हत्येचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.एका विवाहितेने आपल्या प्रियकराच्या मदतीनेपतीची हत्या केली. दोघांनी आधीपतीला भरपूर दारू पाजली त्यानंतर त्याच्यावर चाकूने वार करत त्याची हत्या केली.हत्येनंतर मृतदेह मोटारसायकलीवरून नेऊन दुर्गम ठिकाणी फेकून दिला. त्यानंतर पोलीस ठाण्यात जाऊन महिलेने पती बेपत्ता झाल्याचा बनाव करत तक्रार दाखल केली.

ही घटनामालाड पश्चिम मालवणीमध्ये घडली. शनिवारी रात्री मृत राजेश चौहानची पत्नी पूजा आणि तिचा प्रियकर इमरान मंसूरी मालवणी पोलीस ठाण्यात गेले व त्यांनी राजेश बेपत्ता झाल्याचे सांगून त्याचा फोटा पोलिसांना दिला. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊत तत्काळ तपास सुरू केला. एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये राजेश आपली पत्नी व इम्रान सोबत बाइकवरून जाताना दिसला. यावरून पोलिसांना संशय आल...