Mumbai, एप्रिल 28 -- Akshaya Tritiya 2025:: अक्षय्य तृतीया हा हिंदू कॅलेंडरमधील सर्वात शुभ दिवसांपैकी एक मानला जातो. या दिवशी केलेले कोणतेही चांगले काम किंवा गुंतवणूक समृद्धी आणि यश मिळवून देते असे मानले जाते. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदी करण्याची जुनी परंपरा आहे. हा प्रसंग आणखी खास करण्यासाठी मुकेश अंबानी यांची कंपनी जिओ फायनान्सने एक शानदार ऑफर जाहीर केली आहे. वास्तविक, कंपनीने 'जिओ गोल्ड २४ के डेज' ऑफर ची घोषणा केली आहे. या कालावधीत डिजिटल सोने खरेदी केल्यास २ टक्क्यांपर्यंत अतिरिक्त सोने मोफत मिळणार आहे. अक्षय्य तृतीयेला डिजिटल सोने खरेदी करू इच्छिणाऱ्या जिओफायनान्स आणि मायजिओ अॅपच्या ग्राहकांसाठी ही खास ऑफर आहे. जिओ गोल्ड 24 के डेज ऑफर ग्राहकांसाठी २९ एप्रिल ते ५ मे २०२५ पर्यंत उपलब्ध असेल.

कंपनीने डिजिटल सोन्याची खरेदी ...