पुणे, फेब्रुवारी 11 -- Pune GBS Update : पुण्यात गुलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस)चा कहर सुरूच आहे. रोज रुग्णसंख्या वाढत असून मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या देखील वाढू लागली आहे. पुण्यात सोमवारी या आजाराने बाधित असलेल्या एका ३७ वर्षीय वाहनचालकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. आरोग्य अधिकाऱ्यांनी या बाबत माहिती दिली. त्यामुळे पुण्यातील जीबीएसशी संबंधित मृत्यूंची संख्या सात झाली असून, यात संशयित आणि खात्रीशीर अशा दोन्ही रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, पुण्यात संसर्गाचे आणखी आठ रुग्ण आढळल्याने संशयित जीबीएस रुग्णांची संख्या १९२ वर पोहोचली आहे. बाधितांची संख्या १६७ झाली आहे, तर २१ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी जीबीएसमुळे मृत्यू झालेली व्यक्ती ही पुण्यात ड्रायव्हर म्हणून काम करत होती. सुरवातीला पा...