भारत, फेब्रुवारी 26 -- High Security Number Plate issue in Pune: राज्य सरकारने दिलेल्या ३० एप्रिलच्या मुदतीपूर्वी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) बसविण्यासाठी जुन्या वाहनांच्या मालकांची धावपळ सुरू आहे. आता पर्यंत १६ हजार पुणेकरांनी ही नंबरप्लेट बसवली आहे. दरम्यान, या नंबरप्लेटसाठी ऑनलाइन नोंदणी करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. काहींसबर चोरटे त्यांना लक्ष करताना दिसत आहे.

नंबर प्लेटसाठी ऑनलाईन पेमेंट करताना नागरिकांना अनेक बनावट वेबसाइट्सचा सामना करावा लागत आहे. काहींकडून सरकारने आकारलेल्या फी पेक्षा अधिक ८९९ रुपये आकारले जात आहे. हे पैसे वेगवेगळ्या खात्यांमध्ये ट्रान्सफर केले जात आहेत. परिणामी अनेक अर्जदारांच्या बँक खात्यातून पैसे कमी होऊन देखील त्यांना या नंबर प्लेटसाठी अपॉइंटमेंट कन्फर्म...