Pune, फेब्रुवारी 5 -- Pune hotel viral News : चंदीगड येथील अल्टरनेटिव्ह मेडिसीन प्रॅक्टिशनर डॉ. अजयिता यांना नुकताच पुण्यातील एका नामांकित फाइव्हस्टार हॉटेलमध्ये अत्यंत वाईट अनुभव आला. या हॉटेलमध्ये प्रचंड अस्वच्छता व घाण होती. तसेच हॉटेलमध्ये चेक-इन केल्यानंतर कोणतीही पूर्वसूचना न देता हॉटेल व्यवस्थपणाने त्यांची रूम परस्पर बदलली. एवढेच नाही तर त्यांच्या रूममध्ये आधी वापरण्यात आलेल्या वस्तु देखील ठेवण्यात आल्या होत्या. या साठी हॉटेल व्यवस्थापनाने दिलगिरी देखील व्यक्त केली नाही. हा संपूर्ण अनुभव त्यांनी सोशल मिडियावर शेअर केला असून, त्यांची पोस्ट व्हायरल झाली आहे. हॉटेलच्या अशा उर्मट वागण्यामुळे त्यांना जुळवून घेण्याशिवाय कोणताही पर्याय राहिला नव्हता असे देखील त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. नेटकऱ्यांनी त्यांच्या पोस्टवर अनेक प्रतिक्रिया दि...