Pune, फेब्रुवारी 2 -- Nigadi Sant Kabir Udyan Leopard Attack : पुण्यात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. ऐरवी जंगलात राहणारा बिबट्या आता मानवी वस्तीत शिरू लागला आहे. आज सकाळी निगडी प्राधिकारणातील संत कबीर उद्यान व दुर्गा टेकडी परिसरात बिबट्या आढळून आला होता. येथील एका बंगल्यात हा बिबट्या घुसला होता. ही बाब बंगल्याच्या केअर टेकरच्या लक्षात आल्याने त्याने ही माहिती वनविभागाला दिली. त्यानंतर वनविभागाचे रेस्क्यू पथक घटनास्थळी आलं. तब्बल २ तासांच्या प्रयत्नानंतर त्यांनी या बिबट्याला जेरबंद केलं. या घटनेमुळे परिसरातील नागरिक दहशीत आहेत.

निगडी प्राधिकरण येथे मोठ्या प्रमाणात झाडी आहेत. या ठिकाणी संत कबीर उद्यान आणि दुर्गा टेकडी परिसर आहे. येथे सकाळी नागरिक फिरण्यासाठी येत असतात. तर अनेक तरुण आणि तरुणी या उद्यानात येत असतात. आज सकाळी या परिसरात असलेल्...