Pune, फेब्रुवारी 7 -- HSC And SSC exam : राज्यात पुढील आठवडण्यात राज्य मंडळाच्या परीक्षा सुरू होत आहे. या परीक्षे दरम्यान, विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमध्ये त्यांच्या पाण्याच्या बाटल्या हॉलमध्ये घेऊन जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. पुण्यात जीबीएसच्या वाढत्या रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर, राज्य मंडळाच्या अधिकाऱ्यांनी फक्त पुण्यासाठी ही परवानगी दिली आहे. या बॉटल विद्यार्थ्यांना वर्गात पर्यवेक्षकाने नियुक्त केलेल्या ठिकाणी ठेवाव्या लागणार आहेत.

पुण्यात जीबीएस आजाराने थैमान घातले आहेत. पुण्यात या आजारामुळे ६ जनांचा मृत्यू झाला आहे. तर रुग्णसंख्या १७३ वर पोहोचली आहे. यामुळे चिंतेचे वातावरण आहे. त्यात पुढील आठवड्यात बारावी आणि दहावी बोर्डाच्या परीक्षा सुरू होणार आहेत. जीबीएस आजार दूषित पाण्यामुळे पसरत असल्याचे निष्पन्न झाल्याने पुण्यातील परीक्...