Pune, जानेवारी 27 -- Pune Baburao Chandere Viral Video : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळचे असणारे पुणे महानगर पालिकेचे माजी नगर सेवक व स्थायी समितिचे सदस्य बाबुराव चांदेरे यांची सामान्य नागरिकांना दमदाटी करण्याचे प्रकार वाढले आहे. जमिनीच्या वादातून एका व्यक्तीला कुस्तीत धोबी पंचाद देतात तसे उचलून जमिनीवर आपटल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या प्रकारणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असतांना त्यांचा आता आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात ते मजुरांना दमदाटी करतांना दिसत आहे.

बाबुराव चांदेरे हे त्यांच्या वादग्रस्त कृतीने नेहमी चर्चेत असतात. चांदेरे यांनी जमिनीच्या वादातून पुण्यात एका नागरिकांना नागरिकाला मारहाण केल्याचा संताप जनक व्हिडिओ व्हायरल झाला होता. मारहाण झालेल्या व्यक्तीला डोक्यावर व गु...