भारत, फेब्रुवारी 27 -- Foreign Currency Seized at Pune airport: दुबईला जाणाऱ्या तीन विद्यार्थ्यांच्या नोटबुकमध्ये तब्बल ४ लाख डॉलर्सची (सुमारे ३ कोटी ४७ लाख रुपये) रोख पकडण्यात आली आहे. ही रक्कम हवालाची असल्याचा संशय असून तिन्ही मुलांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांना तस्करीप्रकरणी माहिती मिळाली होती. पुण्यातील एका ट्रॅव्हल एजंटकडून या बॅगेत रोख रक्कम असल्याची माहिती मिळाली होती. कस्टमच्या अधिकाऱ्यांनी या बॅगेची तपासणी केल्यावर त्यात रोख रक्कम आढळली.

परकीय चलन तस्करीशी संबंधित संशयित हवाला रॅकेटचा तपास पुणे कस्टम करत असताना ही कारवाई करण्यात आली. दुबईला जाणाऱ्या तीन विद्यार्थिनींनी नेलेल्या नोटबुकच्या पानांमध्ये मोठ्या प्रमाणात परकीय चलन लपवून ठेवण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली.

भारतीय अधिकाऱ्य...