Pune, जानेवारी 26 -- पुणेरी पाट्या जशा प्रसिद्ध आहेत तसेच अभिनव जाहिराती प्रसिद्ध करून पुणेकर मार्केटिंगचा नवा फंडा बाजारात आणत आहेत.आज प्रजासत्ताक दिनी पुण्यातील एका दुकानदाराने मार्केटिंगचा फंडा म्हणून केवळ एक रुपयात ड्रेस घेऊन जा, अशी जाहिरात केली. याचे शहरभर पॉम्पलेटही वाटले.याचा परिणाम असा झाला की, आज सकाळपासूनच १ रुपयात ड्रेस खरेदी करण्यासाठी दुकानासमोर महिलांची झुंबड उडाली. महिलांची गर्दी पाहून दुकानदाराला धडकी भरली व त्याने दुकान बंद करून पलायन केले. ड्रेस मिळत नसल्याचे पाहून पुणेकर महिलाही संतप्त झाल्या त्यांनी दुकान फोडण्याची धमकी तर दिलीच पण बाहेर पुतळ्यांना घातलेले कपडेही काढून नेले. परिस्थिती हाताबाहेर जात असलेली पाहून पोलिसांना पाचारण केले गेले व स्थिती नियंत्रणात आणली.

होलसेल खरेदीसाठी अन्य शहरातून लोक पुण्यात येत असतात. अ...