Pune, फेब्रुवारी 3 -- Pune Traffic News : पुण्यात वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. चौका चौकात होणाऱ्या ट्रॅफिक जॅममुळे पुणेकर वैतागले आहेत. ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुणे महानगर पालिकेने पुढाकार घेतला असून आता १०० दिवसांच मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे. या अंतर्गत पुण्यातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी शहरात ३० मिसिंग लिंक व रस्ता रुंदीकरण करून ९ बॉटल नेक काढून टाकले जाणार आहेत. या साठी शहरात १५ आदर्श रस्त्यांसोबतच उर्वरीत १७ रस्त्यांचेही डांबरीकरण, रुंदीकरण व वाहतुकीला अडथळा ठरत असलेल्या अतिक्रमांनावर बुलडोजर चालवला जाणार आहे.

पुण्यात वाहनांची संख्या वाढली आहे. तसेच शहरात विकासकामे सुरू असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. ही वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन उपाय योजना सुरू करण्यात आल्या आहेत. पुणे पालिके तर्फे वाहतूक कोंडी...