Kolhapur, जानेवारी 28 -- Guillain Barre Syndrome : पुण्यात गुलेन-बॅरे सिंड्रोम बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असतांना आता कोल्हापुरात देखील या आजारचे रुग्ण आढळले आहे. दोघाजणांना याची लागण झाली असून त्यांचावर कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यातील एक रुग्ण हा कर्नाटकातील कोगणोळी इथला आहे. तर दुसरा हा हुपरी येथील आहे. हा आजार संसर्गजन्य नसल्याने नागरिकांनी घाबरू नये असे आवाहन कोल्हापूर प्रशासाने केले आहे. दरम्यान, केंद्राचे आरोग्य पथक राज्यात दाखल झाले असून ते डॉक्टरांना उपचारासंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत.

राज्यात सर्वात आधी पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचे रुग्ण आढळले. गेल्या काही दिवसांत रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढली आहे. पुण्यात सध्या १११ रुग्ण असून यात ६८ पुरुष तर ३३ महिला आहेत. यातील १७ रुग्ण व्हेंटिलेटरवर ...