Delhi, जानेवारी 30 -- ED PMLA act action : देशातील मनी लॉन्ड्रिंग आणि संबंधित बाबींवर लक्ष ठेवणाऱ्या सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नुकतीच मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याशी (पीएमएलए) संबंधित मोठी आकडेवारी जाहीर केली आहे. या कायद्यांतर्गत गेल्या २० वर्षात ईडीने आतापर्यंत १.४५ लाख कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केल्याची माहिती दिली आहे.

ईडीच्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या पहिल्या नऊ महिन्यांतच ईडीने २१,३७२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. पीएमएलए कायदा १ जुलै २००५ पासून लागू झाला. कर चुकवेगिरी, काळ्या पैसा, साठेबाजी आणि मनी लॉन्ड्रिंग सारख्या गंभीर गुन्ह्यांना आळा घालणे हा या कायद्या मागचा मुख्य उद्देश होता.

हा कायदा लागू झाल्यापासून एजन्सीने गेल्या २० वर्षात आतापर्यंत ९११ जणांना विविध गुन्हात अटक केली आहे. पीएमएलए अंतर्गत आता...