Mumbai, जानेवारी 26 -- Hockey Player PR Sreejesh Padma Bhushan Award : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या हॉकी संघाने कांस्यपदक जिंकले. या विजयात गोलकीपर पीआर श्रीजेश याचा सिंहाचा वाटा होता. या ऐतिहासिक विजयानंतर श्रीजेशने आपल्या १८ वर्षांच्या हॉकी कारकिर्दीला निरोप दिला.

कांस्यपदकाच्या लढतीत भारताने स्पेनचा २-१ असा पराभव केला होता. भारतीय हॉकी संघाने सलग दुसऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. यापूर्वी त्याने टोकियो ऑलिम्पिक (२०२०) मध्येही ही कामगिरी केली होती.

दरम्यान, पीआर श्रीजेशसाठी 'मोस्ट लाइकेबल ॲथलीट' असे विशेषण वापरले जाते. याचा अर्थ सर्वांचा मोस्ट फेव्हरेट ॲथलीट असा होतो.

सध्याच्या भारतीय हॉकी संघामध्ये पीआर श्रीजेशसारखा कोणीच नाही, असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. त्याच पीआर श्रीजेश याचा भारत सरकारने आता गौरव केला आहे. श्...