New delhi, मार्च 5 -- पासपोर्ट हा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे जो परराष्ट्र मंत्रालयाच्या पासपोर्ट विभागाद्वारे जारी केला जातो. ओळख तसेच नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी हा महत्त्वाचा दस्तऐवज आहे. पासपोर्टशिवाय परदेशात (काही देश वगळता) जाणे शक्य होणार नाही. परदेशातील पासपोर्टद्वारेच आपले नागरिकत्व सिद्ध केले जाते. भारत सरकारने पासपोर्ट बनवण्याच्या नियमांमध्ये बदल केला आहे. आता कोणत्याही अर्जदाराला जन्म दाखला देणे बंधनकारक करण्यात आले आहे. म्हणजेच १ ऑक्टोबर २०२३ नंतर जन्मलेल्या आणि पासपोर्ट बनवण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तींना आता त्यांच्या जन्मतारखेचा जन्म दाखला देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

1. जन्म दाखला : १ ऑक्टोबर २०२३ नंतर जन्मलेले लोक जर पासपोर्ट मिळवू इच्छित असतील तर त्यांच्या जन्मतारखेसाठी फक्त जन्म दाखला वैध असेल. मात्र, यापूर्वी जन्मलेले...