भारत, जून 12 -- Foot Ulcers During Monsoon: पावसाळ्यात संसर्गाचा धोका आणि जखमा बऱ्या होत नसल्याने पायाच्या अल्सरचा धोक उद्भवतो. म्हणूनच पायाची योग्य स्वच्छता राखणे गरजेचे आहे.पावसाळा सुरू झाला की अनेक प्रकारचे आजार होतात. या ऋतूत घाणेरड्या पाण्यात बॅक्टेरिया वेगाने पसरतात आणि त्यामुळे इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो. फुट अल्सरची समस्या असलेल्यांसाठी हा ऋतू आव्हानात्मक ठरू शकतो. चेंबूर येथील सुराणा सेठिया हॉस्पिटलचे व्हॅस्क्युलर सर्जन आणि इंटरव्हेंशनल रेडिओलॉजिस्ट डॉ. अशांक बन्सल यांनी पावसाळ्यात पायांची काळजी कशी घ्यावी हे सांगितले.

तुम्हाला माहित आहे का? पायाचे अल्सर हे पायावरील फोड किंवा जखमा आहेत जे सामान्यतः तळव्यांवर आढळून येतात. त्याची कारणं म्हणजे रक्ताभिसरण योग्यरित्या न होणे, मधुमेह किंवा त्वचेवर दीर्घकाळ दाब पडणे. हे अल्सर वेदनाद...