Shivpuri, फेब्रुवारी 27 -- मध्य प्रदेशातील शिवपुरीमध्ये एका ५ वर्षाच्या मुलीसोबत क्रूरतेच्या सर्व सीमा ओलांडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ५ वर्षाच्या चिमुकलीवर केलेल्या अत्याचारात या निष्पाप मुलीच्या गुप्तांगाला २८ टाके पडले आहेत, तिचे डोके भिंतीवर आपटेले गेले. इतके करूनही नराधमाचे मन भरले नाही. त्याने मुलीच्या संपूर्ण शरीराचा चावा घेत तिला गंभीर जखमी केले. शिवपुरीत रक्ताने माखलेल्या अवस्थेत सापडलेली पाच वर्षांची निष्पाप मुलगी सध्या ग्वाल्हेरच्या कमला राजा हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात (आयसीयू) मृत्यूशी झुंज देत आहे.

आपत्कालीन शस्त्रक्रिया करणाऱ्या कमला राजा रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की, सुरुवातीला मुलीची प्रकृती चिंताजनक होती. जेव्हा तिला दाखल करण्यात आले तेव्हा डॉक्टरांनी मुलगी जिवंत राहणार नाही, असे गृहित धरले होते.

श...