Mumbai, फेब्रुवारी 12 -- Share Market News : बिर्ला समूहाची कंपनी एक्सप्रो इंडियाच्या शेअरमध्ये गेल्या ५ वर्षांत ७४०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. या कालावधीत गुंतवणूकदारांचे पैसे १ लाखांवरून ७५ लाख झाले आहेत. कंपनीच्या शेअरमधील ही तेजी आजही सुरूच असून आज हा शेअर ५.५६ टक्क्यांहून अधिक वाढून १२११.०५ रुपयांवर पोहोचला आहे.

गेल्या पाच वर्षांत एक्सप्रो इंडियाच्या शेअरमध्ये ७,४०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. या काळात कंपनीचे शेअर्स १६ रुपयांवरून १२०० रुपयांपर्यंत वधारले आहेत. एक्सप्रो इंडियाच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा उच्चांक १६७५.५५ रुपये आहे. तर, कंपनीच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ८६७.१० रुपये आहे.

हा शेअर १४ फेब्रुवारी २०२० रोजी १६.६३ रुपयांवर व्यवहार करत होता, तो आज १२४८.८० रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या ५ वर्षात कंपनीच्या शे...