Delhi, फेब्रुवारी 7 -- Hamas In POK : भारताचं टेंशन वाढलं आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील रावलकोट येथे झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासशी हातमिळवणी केली. दोन्ही दहशतवादी संघटनेच्या नेत्यांची या ठिकाणी बैठक झाली. या बैठकींत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना त्यांनी शत्रू घोषित केलं. या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये जैशचा एक नेता काश्मीरच्या लढ्याबद्दल बोलताना दिसत आहे. तसेच मोदी आणि शहा हे त्यांचे शत्रू असून काश्मीरसाठी ते एकत्र आले असल्याचं यावेळी दोन्ही संघटनेच्या दहशतवाद्यांनी म्हटलं आहे.

गुप्तचर यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानची इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय) आता हमासला जैश-ए-मोहम्मदसोबत काश्मीरम...