Mumbai, मे 14 -- Mumbai Rain Water Cut News : मुंबईत सोमवारी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे मुंबईच्या पाणी पुरवथ्यावर देखील मोठा परिणाम झाला आहे. वादळामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड झाला आहे. पावसामुळे येथील २२ केव्ही विद्युत उपकेंद्राचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे कुर्ला येथील दक्षिण वाहिनीतून मुंबईला होणारा पाणीपुरवठा हा बंद कऱण्यात आला आहे. या केंद्रातील दुरुस्तीचे कामे पूर्ण होईपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

सोमवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे मुंबईकरांची चांगलीच धांदल उडाली. घाटकोपर येथे होर्डिंग कोसळल्याने १४ जणांचा मृत्यू झाला आहे. या पावसामुळे मुंबईच्या लोकल सेवेवर देखील परिणाम झाला होता. या सोबतच मुंबईचा पाणी पुरवठा देखील विस्कळीत झाला आहे. वा...