New delhi, मार्च 30 -- जगाची लोकसंख्या ८ ट्रिलियनपेक्षा जास्त आहे. मात्र, काही लोक असे आहेत जे जगाची लोकसंख्या वेगाने वाढवण्यासाठी आपले पूर्ण योगदान देत आहेत. अशाच एका कारणामुळे जर्मनीतील एका महिलेची कहाणी सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. याचे कारण म्हणजे ती स्त्री आई बनली आहे. आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण होत असेल की आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे? खरं तर या महिलेने वयाच्या ६६ व्या वर्षी आपल्या दहाव्या मुलाला जन्म दिला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या महिलेने तंत्रज्ञानाच्या मदतीशिवाय नैसर्गिकरित्या बाळाला जन्म दिला आहे.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, अलेक्झांड्रा हिल्डेब्रँड या महिलेने १९ मार्च रोजी बर्लिनमधील चॅरिटे रुग्णालयात सिझेरियन शस्त्रक्रियेद्वारे मुलाला जन्म दिला. बाळाचे वजनही नॉर्मल होते आणि महिलेची तब्येत खूप चांगली आहे. बर्...