Delhi, फेब्रुवारी 6 -- Supreme Court : पतीपासून विभक्त झाल्यानंतर पत्नीच्या पोटगीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. पहिले लग्न कायदेशीररीत्या रद्द झाले नसले तरी दुसऱ्या पतीकडून पोटगी मिळण्याचा अधिकार महिलेला राहील, असे न्यायालयाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, जर महिला आणि पहिला पती संमतीने विभक्त झाले असतील तर कायदेशीर घटस्फोट नसल्यामुळे तिला दुसऱ्या पतीकडून पोटगी मिळण्यापासून रोखता येणार नाही.

तेलंगणा उच्च न्यायालयाने पहिल्या पतीचे लग्न कायदेशीररित्या संपुष्टात आणले नसल्याच्या कारणास्तव दुसऱ्या पतीकडून सीआरपीसीच्या कलम १२५ अन्वये महिलेला पोटगी नाकारण्याचा आदेश जारी केला होता. आता सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात महिलेचे अपील स्वीकारले आहे. न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती...