Mumbai, फेब्रुवारी 13 -- Aaditya Thackeray : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 'महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार' देऊन सत्कार करणाऱ्या शरद पवार यांच्यावर ठाकरेंच्या शिवसेनेनं टीकेची झोड उठवली आहे. उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यानंतर आता आदित्य ठाकरे यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. 'घाणेरडी कामं करणाऱ्याचा सन्मान आम्ही करू शकत नाही आणि ते आम्हाला मान्यही नाही,' असं आदित्य ठाकरे म्हणाले.

ते 'एएनआय' या वृत्तवाहिनीशी बोलत होते. 'शरद पवार यांचं वय, ज्येष्ठता किंवा तत्त्वांवर मी भाष्य करणार नाही. मात्र, आमची तत्त्वं वेगळी आहेत. जो कोणी महाराष्ट्राच्या विरोधात काम करतो, जो कोणी महाराष्ट्राच्या हिताशी तडजोड करतो तो आमच्या दृष्टीनं महाराष्ट्र द्रोही आहे. आणि महाराष्ट्रासारख्या एखाद्या राज्याशी द्रोह म्हणजे ते देशाशी द्रोह असतो. त्यामुळं तो माणूस द...