New delhi, फेब्रुवारी 11 -- Eknath shinde awarded mahadji shinde rashtriya Gaurav award : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्लीमध्ये 'महादजी शिंदे राष्ट्र गौरव' पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमानिमित्त शरद पवार व एकनाथ शिंदे एकाचा मंचावर आले होते. या कार्यक्रमादरम्यान एकनाथ शिंदेंनी जबरदस्त भाषण करत शरद पवारांवर स्तुतीसुमने उधळली. यावेळी त्यांनी शरद पवारांच्या राजकारणातील गुगलीबद्दल विधान केले. यावेळी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेही उपस्थित होते.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा दिल्लीत होत आहे. त्या निमित्ताने सरहद संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सन्माननीय व्यक्तींचा ...