MP, फेब्रुवारी 14 -- जर एखाद्या पुरुषाची पत्नी परपुरुषावर प्रेम करत असेल तर तो व्यभिचार मानता येणार नाही. जोपर्यंत ती दुसऱ्या पुरुषासोबत शारीरिक संबंध ठेवत नाही तोपर्यंत त्याला व्यभिचार म्हणता येणार नाही, असा महत्वपूर्ण निकाल मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायमूर्ती जी. एस. अहलुवालिया म्हणाले की, व्यभिचार तेव्हाच होतो जेव्हा शारीरिक संबंध असतात. पतीने कोर्टात दावा केला होता की, त्याची पत्नी दुसऱ्या कोणाच्या तरी प्रेमात आहे. अशा परिस्थितीत तिला पोटगी चा अधिकार नाही.

भारतीय नागरी संरक्षण संहितेच्या कलम १४४ (५) आणि सीआरपीसीच्या कलम १२५ (४) नुसार पत्नीवरील व्यभिचाराचे आरोप खरे सिद्ध झाले तरच तिला पोटगीपासून वंचित ठेवता येईल, असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने निकालात म्हटले आहे की, व्यभिचार सिद्ध करण्यासाठी शारीरिक संबंध सिद्ध...