भारत, फेब्रुवारी 8 -- दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या शानदार कामगिरीमुळे अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्यासह आम आदमी पक्षाच्या अनेक बड्या नेत्यांना पराभवाला सामोरे जावे लागले पण मुख्यमंत्री आतिशी यांना विजय मिळवता आला. आतिशी यांनी भाजपच्या रमेश बिधूडी यांचा ३,५२१ मतांनी पराभव केला. धक्कादायक बाब म्हणजे पक्ष पराभवाच्या दु:खात बुडालेला दिसत असतानाच आतिशी यांनी सायंकाळी भव्य रोड शोसारखी मिरवणूक काढली.

Delhi Result : दिल्ली 'आप-दा'पासून मुक्त, त्यांना लूट परत करावी लागणार; मोदींचा केजरीवालांना जाहीर इशारा

मिळालेल्या माहितीनुसार, माजी मुख्यमंत्री आणि कालकाजी विधानसभा मतदारसंघातील 'आप'च्या उमेदवार आतिशी जेव्हा त्यांच्या निवासस्थानी पोहोचल्या, तेव्हा त्यांच्या समर्थकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. आतिशी यांनी आपल्या विजयाचा आनंद सा...