Delhi, फेब्रुवारी 10 -- Pariksha Pe Charcha : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थी, त्यांचे पालक व शिक्षकांशी संवाद साधणार आहे. या द्वारे ते मुलांना तणावविरहित वातावरणात परीक्षा कशा द्यायच्या याच्या टिप्स देणार आहेत. आज सकाळी ११ वाजता नवी दिल्लीतील प्रगती मैदानातील भारत मंडपम येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी ३.३० कोटींहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यापैकी, निवडलेल्या सुमारे २,५०० विद्यार्थ्यांना कार्यक्रमात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये केंद्रीय विद्यालय, सैनिक शाळा, एकलव्य मॉडेल निवासी शाळा आणि नवोदय विद्यालय यासारख्या सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात, पंतप्रधान नरेंद्र मोदी बोर्डाच्या परीक्षेप...