भारत, फेब्रुवारी 14 -- PM Modi Meet Donald Trump : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहे. मोदी यांचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जंगी स्वागत केले. दोघामध्ये द्विपक्षीय बैठक पार पडली असून यात अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. बांग्लादेश, रशिया युक्रेन युद्ध, द्विपक्षीय संबंध, एफ ३५ लढाऊ विमान आदी विषयांवर या बैठकीत चर्चा झाली.

डोनाल्ड ट्रम्प आणि पीएम मोदी यांच्यात मुंबई वरील दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाचे भारतात प्रत्यार्पण यावर चर्चा झाली. तहव्वुर राणाचे भारताला प्रत्यार्पण करण्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंजूरी दिली. व्हाईट हाऊसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत संयुक्त पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी ही घोषणा केली. २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याप्रकरणी दोषी ठरलेला आणि जगातील ...