Prayagraj, फेब्रुवारी 5 -- PM Narendra Modi in Mahakumbh : महाकुंभ २०२५ मध्ये आज बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रयागराज येथे वैदिक मंत्रोच्चारात त्रिवेणी संगमात स्नान केलं. यावेळी सीएम योगी आदित्यनाथ आणि अनेक संत उपस्थित होते. संगम स्नानानंतर पंतप्रधान मोदी यांनी विधिवत गंगापूजन केले. याआधी त्यांनी सीएम योगी यांच्यासोबत बोटीतून गंगा विहार देखील केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रयागराजमधील बमरौली विमानतळावर पोहोचल्यानंतर राज्यपाल आनंदीबेन पटेल, सीएम योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक आणि केशव प्रसाद मौर्य यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर पंतप्रधान हेलिकॉप्टरने डीपीएस हेलिपॅडवर पोहोचले. तेथून त्यांचा ताफा चोख बंदोबस्तात अरैलच्या व्हीआयपी घाटात पोहोचला. अरैल घाटातून पंतप्रधान मोदी हे बोटीने संगम नोज येथे पोहोचले. यावेळी सीए...