Amritsar, जानेवारी 27 -- Dr. Babasaheb Ambedkar statue vandalise in Amritsar : पंजाबमधील अमृतसरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. एका माथेफिरूने त्यांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी लावलेल्या शिडीवर चढून पुतळ्यावर हातोड्याने वार केले. यामुळे हा पुतळा तुटला आहे. जवळ असणाऱ्या संविधान प्रतिमेची देखील आरोपीने तोडफोड केली आहे. या घटनेमुळे पंजाबमध्ये मोठा तनाव निर्माण झाला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तर चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.

अमृतसरच्या सुवर्ण मंदिराकडे जाणाऱ्या हेरिटेज रस्त्यावरील टाऊन हॉल येथे असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अमृतसर पोलिस करत आहेत. सोशल मीडियावर या घटनेच्य...