भारत, एप्रिल 3 -- अॅमेझॉन प्राईम व्हिडिओने 'पंचायत'च्या चाहत्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मने आपल्या नवीन सीझनच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. ही मालिका 2020 साली सुरू झाली होती. आज या मालिकेला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. अशातच अॅमेझॉन प्राईम व्हिडिओने 'पंचायत ४' २ जुलै रोजी प्रदर्शित होणार असल्याची घोषणा केली.

अॅमेझॉन प्राईम व्हिडिओने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत सांगितले की, 'पंचायत'चा चौथा सीझन २ जुलै रोजी ओटीटीवर धडकणार आहे. 'पंचायत ४' मध्ये आणखी नाटक, हास्य आणि भावनिक क्षण येतील जे फुलेराचे जग चाहत्यांच्या जवळ आणतील, असे निर्मात्यांनी आश्वासन दिले आहे.

पंचायत 4 पोस्टर

पंचायत ४ मधील स्टार कास्ट -

'पंचायत ४'मध्ये जितेंद्र कुमार, नीना गुप्ता, रघुबीर यादव, फैजल मलिक, चंदन रॉय, संविका, दुर्गेश कुमार, सुनीता र...