भारत, फेब्रुवारी 1 -- अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२५ च्या अर्थसंकल्पात नोकरदार वर्ग, शेतकरी, वृद्ध आणि छोट्या व्यावसायिकांना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केला. नव्या कर प्रणालीनुसार पगारदारांना १२.७५ लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर आणि १२ लाख रुपयांपर्यंतच्या वेतन नसलेल्या लोकांना करातून सूट देण्यात आली आहे. मात्र ज्यांचे वार्षिक उत्पन्न या मर्यादेपेक्षा जास्त आहे, त्यांना कर भरावा लागणार आहे.

किसान क्रेडिट कार्डची (केसीसी) कर्जाची मर्यादा तीन लाखरुपयांवरून पाच लाख रुपये करण्यात आली असून, याचा फायदा ७.७ कोटी शेतकरी, मच्छीमार आणि दुग्धउत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. हवाई कनेक्टिव्हिटीला चालना देण्यासाठी उडान योजनेत १२० नवीन शहरे जोडली जातील, ज्यामुळे ईशान्य क्षेत्राशी देशभरातील कनेक्टिव्हिटी मजबूत होईल.

Income Tax Budget 2...