Mumbai, मे 19 -- राज्यसभा निवडणुकीच्या (Rajya Sabha Election) पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय जुळवाजुळव सुरू झाली आहे. अपक्ष म्हणून निवडणुकीच्या मैदानात उतरलेले संभाजीराजे भोसले (Sambhaji Raje Bhosale) यांनी भेटीगाठीला सुरुवात केली आहे. आज संभाजीराजेंनी 'वर्षा' निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. या भेटीचा संबंध थेट राज्यसभेच्या निवडणुकीशी जोडला जात आहे.

राज्यसभेच्या सहा रिक्त जागांसाठी लवकरच निवडणूक होत आहे. संख्या बळानुसार भाजपचे दोन उमेदवार सहज निवडून येणार आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचा प्रत्येकी एक उमेदवार राज्यसभेवर जाऊ शकणार आहेत. एकच उमेदवार निवडून आणण्याची ताकद असतानाही शिवसेनेनं दोन उमेदवार देण्याची घोषणा केली आहे. तर, याआधी राष्ट्रपतींच्या कोट्यातून राज्यसभेवर गेलेले संभा...